spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सहकार पुरस्कार 2023-24 करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

18 ऑगस्ट पर्यंत पाठविता येणार प्रस्ताव

नागपूर,दि. २ : राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकार पुरस्कार 2023-24 करिता संस्थांना प्रस्ताव मागविण्यात आले असून 18 ऑगस्ट 2025 पर्यंत प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुदाम काठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सहकार पुरस्काराकरिता तीन भागातील निकषानुसार पात्र सहकारी हातमाग, यंत्रमाग व सुतगिरणीचे प्रस्ताव प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, प्रशाकीय इमारत क्रमांक 2,बी विंग, आठवा माळा,सिव्हील लाईन,नागपूर                      -440001 या कार्यालयात नियत कालावधीत पाठविण्यात यावे,असे सांगण्यात आले आहे.सहकार पुरस्कार 2023-24 च्या अनुषंगाने संस्था प्रकारात प्रस्ताव पाठविण्याचे निकष व गुणांकन याची माहिती सहकार आयुक्तालयाच्या http;//sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Popular Articles