Friday, July 3, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रधानमंत्री पीक विमा योजना- 2025 ला 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

नागपूर, दि. २ : केंद्र शासनाद्वारे ‘सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2025’ ला 14 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नागपूर विभागातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभाग घ्यावा,असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2025 मध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 होती. मात्र, अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नसणे, पीएमएफबीवाय पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार व सीएससी सर्व्हरवरील व्यत्यय आदि तांत्रिक अडचणींमुळे या योजनेतील शेतकऱ्यांच्या सहभागावर परिणाम लक्षात घेता.केंद्र शासनाच्या 1 ऑगस्ट               2025 रोजीच्या निर्देशानुसार योजनेत अधिसूचित खरीप पिकांकरीता बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 14 ऑगस्ट 2025 व कर्जदार शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.

www.pmfby.gov.in पोर्टलवर स्वत: शेतकऱ्यांनी तसेच बँक विमा कंपनीचे नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप सामुहिक सेवा केंद्र सीएससी यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.