मुख,स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी अत्याधुनिक सुविधा व्हॅन मध्ये उपलब्ध
गोंदिया २२ : कॅन्सर स्क्रिनिंग व्हॅनचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगंथम आणि जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले असून हि व्हॅन पुढचा एक महिना जिल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात जाणार असून तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते स्क्रीनिंग करण्यात आलेल्या रुग्णावर उपचार करणार आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना शासनामार्फत मोफत उपचार मिळावे,या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘मोबाइल कर्करोग तपासणी व्हॅन’ सुरू केली असून नागपूर विभागांतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी ही हॅन दाखल झाली असून, आहे, ही व्हॅन ग्रामीण व शहरी भागातील गावोगावी पोहोचून नागरिकांची मोफत तपासणी करणार आहे. एका दिवसात १०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर.पुरुषोत्तम पटले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुर्गानंथम यांनी सांगितले आहे.
जगभरात ४ फेब्रुवारी ला जागतिक कर्करोग दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने राज्यात ‘कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम २०२५’ राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून मोबाईल कर्करोग शोध केंद्र गोंदियामध्ये या मोबाइल व्हॅनद्वारे मोफत तपासणी मोहिमेला सुरुवात होत झाली आहे.’मोबाइल व्हॅनमुळे रुग्णांचा मौल्यवान वेळ वाचेल, लवकर निदान होऊन उपचार सुलभ होतील. त्यामुळे नागरिकांनी नियमित तपासणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा,’ असे डॉ. सुवर्णा हुबेकर, कॅम्पेन कोऑर्डिनेटर आणि सामाजिक कार्यकर्त्या भावना कदम यांनी सांगितले आहे.
हि मोबाईल व्हॅन गावात पोहचताच ज्या लोकांना कॅन्सरची लक्षणे आहेत अश्या लोकांनी मोफत कॅन्सर तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




