७/१२ कोरा शेतकरी कर्जमाफी हवीच बैलाच्या पाठीवर घोष वाक्य
गोंदिया २२ :
प्रहार जनशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार 22 ऑगस्ट ला सर्वत्र जिल्ह्यात पोळा शेतकऱ्यांच्या सण साजरा केला जातो .
शेतकऱ्यांच्यासाठी राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्जा राजा म्हणजे बैलांचा सण म्हणून पोळा साजरा केला जातो.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हा दिवस संघर्षाच्या पोळा कर्जमुक्तीच्या पोळा* म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे या पोळ्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्याला बळ देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांच्या जरीवर ७/१२कोरा शेतकरी कर्जमाफी हवीच! अशा संघर्षाच्या घोष लिहिण्याचे आव्हान करण्यात आले आहे. नवेझरी तसेच घाटकुरोडा परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या पाठीवर हे घोषवाक्य लिहिले असुन यासाठी महेद्र भांडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष,पंचायत समिती सदस्य समिता भंडारकर यांनी पुढाकार घेतला असुन जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी बैलांच्या जरीवर सातबारा कोरा शेतकरी कर्जमाफी असे लिहिण्याचे आव्हान प्रहार जनसक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे.


