Home Latest News  नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0
65

 

नागपूर १२ : नंदनवन पोलिसांनी गुप्त माहितीनुसार छापा टाकत शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला आहे.

दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.20 ते 6.50 वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हसनबाग कब्रस्तान जवळील गली क्र. 2 मध्ये राहणारा हुसैन खान सरफराज खान (वय 32) हा विक्रीसाठी नायलॉन मांजा आपल्या ताब्यात ठेवून आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचासमक्ष छापा मारण्यात आला. तपासादरम्यान आरोपीच्या जवळील दोन प्लास्टिक पोत्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा आढळला. त्यामध्ये 192 नग मोनो फिल गोल्ड मांजा व 240 नग मोनो काईट लेबल असलेले चक्रीसह मांजा असा एकूण 3,74,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 5 व 15 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि विनायक कोळी, दुपोनि जयवंत पाटील, पोउपनि प्रदीप काईट, पोहवा आशिप तितरमारे, अनिल धनोले, संजय वरवाडे, पोअं प्रदीप भदाडे, सोमेश्वर घुगल व संजय मोकादम यांनी केली.