– केळवद पोलीसांची कामगिरी
केळवद :- केळवद पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, कारने अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ पोलीस स्टेशन केळवद समोर नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान चारचाकी वाहन एम. एच. २७ डि.ए. ५१९७ही मिळुन आली. वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात विदेशी दारू मिळुन आली. आरोपी कं १) मुकेश राधेलाल जैस्वाल, वय ३९ वर्ष (चालक), कं २) अक्षय जयवंत नांदुरकर, वय २५ वर्ष, दोन्ही रा. वार्ड नं ३ गार्डन चौक कळंब ता. कळंब, जि. यवतमाळ हे अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष BLUE OFFICER CHOICE WISKEY, McDowellS NO 1 RUM, OLD MONK RUM अशा विविध कंपनीची विदेशी दारू किंमती २,२४,०३२/- रूपये, महींद्रा कंपीनीची कार एम एच २७ डि ए ५१९७ आणि एक अॅन्ड्राईड मोबाईल असा एकुण किंमती १०,२९,०३२/-रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
नमुद आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन केळवद येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीतांना पोलीसांनी अटक केली आहे.








