spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

– आरोपी अटक

केळवद :- केळवद पोलीस पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारद्वारे माहिती मिळाली की, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक होत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी बिहाडा फाटा येथे नाकाबंदी केली असता पाढुर्णा कडुन मोटर सायकल एम. एच. ४० ए. एल. ७७८२ येतांना दिसली. सदर वाहन थांबवुन पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु मिळुन आला. वाहन चालक आरोपी नामे कैलास धर्मराज गायकवाड वय ४५ वर्ष रा. गादा पोस्ट अजनी, ता. कामठी जि. नागपुर याचे ताब्यातुन प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु ५० किलो एकुण किंमती २५,०००/- रूपये, तसेच मोटर सायकल एम.एच ४०ए एल ७७८२ किंमती ४०,०००/- रूपये असा एकुण ६५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद आरोपीविरूद्ध पोस्टे केळवद येथेभारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ सह कलम अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. नमुद आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

Popular Articles