– ०७ गोवंश जनावरांची सुटका
केळवद :- केळवद पोलीसांना माहीती प्राप्त झाली की, अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक केली जात आहे. अशी माहीती मिळताच पोलीसांन सदर वाहन शोध कामी सतर्क पेट्रोलींग केली असता बिहाडा फाटा येथे एक संशयीत टाटा कंपनीची मांझा कार क्र. क्र. एम एच २७ ए सी ७५७६ हे वाहन दिसुन आले. त्यास थांबण्याचा इशारा केला असता पोलीसांना पाहुन सदर वाहन चालकाने त्याचे वाहन न थांबवता पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने पोलीसांनी नमुद वाहनाचा पाठलाग केला असता आरोपी वाहन चालकाने आपले वाहन रोडच्या कडेला थांबवुन झाडा झुडपाचा फायदा घेवुन पळुन गेला पोलीसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता कार मधील मागील सिट काढून त्यामध्ये ०७ गोवंश जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अंत्यत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, निर्दयतेने शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले.पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून संशयीत टाटा कंपनीची मांझा कार क्र. एम एच २७ ए सी ७५७६ किंमती २,५०,०००/- रूपये आणि ०७ गोवंश जनावरे किंमती १,०५,०००/- रूपये असा एकुण किंमती ३,५५,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला.
नमुद प्रकरणी पोलीस स्टेशन केळवद येथे मांझा कार क्र. एम एच २७ ए सी ७५७६ च्या चालका विरूध्द कलम २८१ भान्यासं, कलम ११(१) (जी), ११(१) (डी), ११ (१) (सी), प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, कलम ५.९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, कलम ११९ मपोका, कलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




