बोरी :- बोरी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, बोरी हद्दीतील एमआयडीसी चौक बुट्टीबोरी सावजी हॉटेल समोर सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या एक इसम लोकांकडुन पैसे घेवुन सट्टापट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचले असता एमआयडीसी चौक बुट्टीबोरी सावजी हॉटेल समोर आरोपी नामे दिलीप महादेव वानखेडे, वय ४९ वर्ष, रा. जुनीवस्ती बुट्टीबोरी हा कागदावर आकडे लिहुन सट्टापट्टी चालवित असतांना मिळुन आला. पोलीसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम ८१०/- रूपये, सट्टापट्टी लिहण्याकरीता वापरलेले साहित्य असा एकुण ८१५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपी नामे दिलीप महादेव वानखेडे, वय ४९ वर्ष, रा. जुनीवस्ती बुट्टीबोरी याच्या विरूद्ध कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




