नागपूर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विकी करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण २१४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये एकुण ०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कारवाई क्र. १. पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत काटोल नागपुर बायपास रजवाडा हॉटेल समोर आरोपी नामे रौनकसिंग सुखविंदरसिंग कंदोला, वय ३४ वर्ष, रा. नारी रोड उपलवाडी नागपूर ह. मु. बायपास रोड काटोल हा हातभट्टीद्वारे मोहाफुलाची गावठी दारू काढतांना मिळुन आला. सदर हातभट्टी नष्ट करत पोलीसांनी पंचासमक्ष ०६ लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती ३००/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. नमुद आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाई क्र. २. पोलीस स्टेशन कोंढाळी अंतर्गत मरगसुर येथे कोंढाळी पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, महिला आरोपी हिने आपले राहते घरी अवैधरीत्या देशी दारू बाळगुन विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे कोंढाळी पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता महिला आरोपी हिच्या राहत्या घराची दारूबाबत पंचासमक्ष घरझडती घेतली असता देशी दारू मिळुन आली. आरोपीस देशी दारू बाळगणे/विक्री करणेबाबत परवाना विचारला असता कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. पोलीसांनी पंचासमक्ष १) देशी दारूच्या १८० एम एल च्या ०६ निपा किंमती ४८०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे. नमुद प्रकरणी आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई क्र. ३. पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत मौजा जैतपुर शिवार येथे केळवद पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, आरोपी नामे पंकज गणपतजी धुर्वे, वय २६ वर्ष रा येलकापार, ता सौसर, जि. छिंदवाडा हा नमुद घटनास्थळी अवैधरीत्या देशी दारू बाळगुन विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे केळवद पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे पंकज गणपतजी धुर्वे, वय २६ वर्ष रा येलकापार, ता सौसर, जि. छिंदवाडा याचे ताब्यातून पोलीसांनी पंचासमक्ष १) देशी दारूच्या १८० एम एल च्या ०५ निपा किंमती ४००/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे. नमुद प्रकरणी आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई क्र. ४. पोलीस स्टेशन बोरी अंतर्गत एमआयडीसी चौक बुटीबोरी सावजी हॉटेल समोर बोरी पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, आरोपी नामे अक्षय विजय पराते, वय ३४ वर्ष, रा. वार्ड क ८, गणेश मंदीर जवळ, हिंगणघाट, जि. वर्धा हा नमुद घटनास्थळी अवैधरीत्या देशी दारू बाळगुन विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे बोरी पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे अक्षय विजय पराते, वय ३४ वर्ष, रा. वार्ड क ८, गणेश मंदीर जवळ हिंगणघाट, जि. वर्षा याचे ताब्यातून पोलीसांनी पंचासमश्न १) देशी दारूच्या १८० एम एल च्या १२ निषा किंमती ९६०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.




