spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड, आरोपी अटक

– ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त

कुही :- पोस्टे कुही येथे दाखल मोटारसायकल चोरीचे गुन्हयातील आरोपी व चोरीस गेलेले वाहनांच्या शोधकामी पोलीस स्टेशन कुही येथील सपोनि इंगोले हे स्टाफसह पोस्टे हद्दीतील मौजा मांढळ या गावात पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की, मौजा भोला हुडकी मांढळ येथील राकेश पिदुरकर हा आपले घरी ठेवलेली ०१ मोटार सायकल विकणार आहे. अशा माहीती वरून पोलीस स्टाफनी राकेश पिदुरकर याचे घरी जावुन पाहीले असता ०१ विना नंबरची हीरो स्प्लेंडर मोटार सायकल मिळुन आली. त्याबाबत त्याला कसुन व विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर मोटार सायकल ही चांपा येथील बाजारातुन चोरी करून आणल्याचे तसेच त्याने आकाश वाकडे व संदेश आंबेकर दोन्ही रा. भोला हुडकी मांढळ यांचेसह मिळुन मौजा कुही, मांढळ (वडेगाव), चांपा, पोस्टे वेलतुर व पोस्टे मौदा हद्दीतील मौजा गुमथळा, वडोदा येथुन १) MH-40 CJ-8659, २) MH-40 CW-3444, ३) MH-40 BQ 5608, ४) MH-40 VJ-5379, ५) MH-40 AE 4003, ६) MH-40 CP 2333, ७) MH-40 CP 4656, ८) MH 40 CK 3445 अशा एकुण ०८ मोटार सायकल चोरी करून त्या लबाडीने फायनान्सचे गाडया असल्याचे भासवुन राजोला मांढळ येथे विक्री केल्याचे सांगीतल्याने सदर आठही मोटार सायकल किंमती ३,२०,०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला. आरोपी १) राकेश विठोबा पिदुरकर वय ३० वर्ष, २) आकाश शामराव वाकडे, ३) संदेश नामदेव आंबेकर तिन्ही रा. भोला हुडकी मांढळ ता. कुही. यांना पोस्टे कुही अप. क्र. ०४/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं. मध्ये अटक करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.