शेतकऱ्यांना बायो डीएपी नावाने खत विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल..

0
25

भंडारा, हंसराज पवणी :-  दिनांक 08/07/2056 रोजी मौजे मांगली चौरस व पौना खु ता. पवनी जि. भंडारा येथील व्यक्ती विनापरवाना खतांची शेतकऱ्यांना विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा भरारी पथकाचे अध्यक्ष एस. एस. वासनिक यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा भरारी पथकातील सदस्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. तपासणीत मेसर्स कृष्णा बायो ऑरगॅनिक, कळवण जि. नाशिक या कंपनीने उत्पादित केलेला व मेसर्स गौरीएन्झी सोल्युशन, नाशिक या कंपनीने मार्केटिंग केलेला बायो डीएपी नावाचे खत 30 बॅग खत आढळून आले. व इतर खत जीवन मायक्रो नावाचे 20 बॅग असा एकूण 2.5 टन वजनाचे 71950 रु खत आढळून आले. संबंधित कंपनीने कडे मार्केटिंग परवाना नसल्याचे आढळून आले. यावर कंपनी व संबंधित व्यक्तींवर पवनी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.