spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

– महिलेने आरडाओरड करताच आरोपीचा घटनास्थळावरून पलायन

कामठी :- घरासमोर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी आरोपी आदित्य रवी बढेल (वय २५, रा. कुंभारे कॉलोनी, कामठी) याच्याविरुद्ध नवीन कामठी पोलिस ठाण्यात कलम २९६, भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ ते ११ वाजताच्या सुमारास संबंधित महिला आपल्या घरी झोपली होती. घराबाहेर कुणीतरी आल्याचा भास झाल्याने तिने उठून पाहिले असता घरासमोरील सार्वजनिक ठिकाणी आरोपी अश्लील कृत्य करताना दिसून आला.

हा प्रकार पाहून महिलेने आरडाओरड केली. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपी विरुद्ध , कलम २९६ बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला असून . पुढील तपास पोलिस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.