सावधान : अंधारात मोहफुल संकलन करणे धोक्याचे

0
34

– निसर्गाची साथ पण सुरक्षिततेची हमी महत्त्वाची!  

– वाघ, बिबट्यांपासून सतर्क राहावे

सचिन चौरसिया, रामटेक :- दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रामटेक तालुक्यातील मोहफूल संकलनाला सुरुवात होते. सद्यःस्थितीत पानगळीला सुरुवात झाली असल्याने मोहफूल संकलनाची चाहूल लागली आहे. महिनाभर हमखास रोजगार देणारा हा हंगाम असला तरी यंदाही वाघ, बिबट, अस्वलांच्या दहशतीतच मोहफूल संकलन करावे आहे. मात्र मोहफूल संकलन करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. सद्या उन्हाळ्याला प्रारंभ झाल्याने जंगल परिसरात हिस्त्र प्राण्यांचा संचार वाढीस लागला आहे.

रामटेक तालुक्यातील काही भागात मोहफुलांच्या झाडांना मोठ्या प्रमाणात कळ्या येण्यास सुरुवात झाली असून, लवकरच मोहफूल हंगामाला सुरुवात होणार आहे. मोहफूल जास्त प्रमाणात मिळावे, यासाठी ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच्या अंधारातच जंगलात जातात. परंतु, पहाटे अंधारात मोहफूलसंकलनाला जाणे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी योग्य ती काळजी न घेतल्यास मानव-वन्यजीव संघर्ष होऊन जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निसर्गाची साथ, पण सुरक्षिततेची हमी महत्त्वाची!

■ मोहफूल संकलन ग्रामीण नागरिकांसाठी महिनाभर रोजगार देणारा महत्त्वाचा हंगाम आहे. मात्र, त्याचबरोबर आपल्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व द्यायला हवे. त्यामुळे वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे हेच हिताचे ठरेल

अशी घ्या काळजी !

■ शक्यतो जास्त वेळ, खाली वाकून गोळा करू नये.

■ एकट्याने जवळपास सावधगिरीने जावे.

■ कारण तिथे मोहफूल जंगलात जाऊ नये.

■ जंगलात चौफेर नजर असावी.

■ म्हाताऱ्या व कमजोर व्यक्तींनी जंगलाते जाणे टोळावे.

■ जंगलात बाघ दिसल्यास सर्वांनी आरडाओरड करून तिथून निघून जावे.

■ पानवठा, तलावाच्या जवळपास सावधगिरीने जावे.

■ हल्ल्यात मृत्यू झाल्यास लाखो रुपये मिळतात, असा विचार करू नये.

■ मोहफूल संकलन करताना खबरदारी बाळगणे गरजेचे.

वाघ, बिबट्यांपासून सतर्क राहावे

■ वन परिक्षेत्र रामटेक व पवनी कार्यक्षेत्र (बांध) बीटमधील वनक्षेत्रात वन्यप्राणी व हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे .दिवसेंदिवस मानव व वन्यप्राणी संघर्षाच्या घटना घडत आहेत. पहाटे तीन वाजेपासून अनेक जंगलात व जंगलालगतच्या शेतशिवारात मोहफुलाचे संकलन करतात. अशावेळी पट्टेदार वाघांसह बिबट व अस्वलांचे हल्ले होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अंधारण मोहफूल संकलन करणे टाळणे हेच हिताचे ठरेल, अशा वनविभागीतील नागरिकांच्या सूचना आहेत.