– “तिकीट नाही? हरकत नाही! चंद्रपूरमध्ये अपक्षांचा धडाका!”
– “तुतारी कुठे वाजतेय… आणि ढोल कुठे फाटतोय?”
– “घरात राष्ट्रवादी, दारात काँग्रेस – चंद्रपूरचा राजकीय विनोद!”
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे यंदा लोकशाहीचा उत्सव नसून पक्षीय गोंधळाचा महाकुंभ ठरत असल्याचे चित्र आहे. तब्बल ८ वर्षांनंतर होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षांचे झेंडे कमी आणि वैयक्तिक अहंकारांचे फड अधिक फडकताना दिसत आहेत.
या निवडणुकीत
👉 काँग्रेस एकमेकांविरुद्ध उभी
👉 भाजप आपल्याच सावलीशी झुंज देताना
👉 आणि अपक्षांनी “तिकीट नाही? काही हरकत नाही!” अशी घोषणा देत मैदान काबीज केले आहे.
काँग्रेस vs काँग्रेस : ‘हाय कमांड’ हरवली?
काँग्रेसमध्ये यंदा उमेदवारी वाटपाने असा काही राजकीय अपघात घडवला की पक्षाचे अधिकृत उमेदवारच अपक्ष काँग्रेस म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
कालपर्यंत ज्यांच्या खांद्यावर काँग्रेस उभी होती, तेच नेते आज काँग्रेसलाच आव्हान देताना दिसत आहेत. माजी शहर जिल्ह्याध्यक्ष नंदू नागरकर व प्रशांत दानव यांनी काँग्रेस चा बीपी वाढवला आहे.
भाजपची स्थितीही फार वेगळी नाही. आमदार किशोर जोरगेवार आणि माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातील विवादाने अक्षरशः हायकामांनड सुद्धा त्रस्त झाले आहे. दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्याना पक्षाची तिकीट न मिळाल्याने घमासान झाले आहे.
👉 भाजप विरुद्ध भाजप
👉 नाराज कार्यकर्त्यांची रांग
👉 आणि ‘आपणच खरे भाजप’ म्हणणाऱ्या अपक्षांची गर्दी
यामुळे निवडणूक चिन्हांपेक्षा नावे, चेहरे आणि जुने हिशेबच अधिक महत्त्वाचे ठरत आहेत.
राष्ट्रवादीत ‘तुतारी’ आणि ‘ड्रम’चा बेसूर सूर
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर परिस्थिती आणखी गंमतीशीर झाली आहे.
अजित पवार गट खासदार नरेश पुगलीय यांच्या विदर्भ किसान काँग्रेस संघटनेसह स्वतंत्र रणनिती राबवत नगरसेवकांची फौज उतरवत आहे.
तर दुसरीकडे शरद पवार गटाची राष्ट्रवादी (तुतारी चिन्ह) तब्बल ६६ पैकी ५५ जागांवर लढत देत असली, तरी प्रत्यक्षात तुतारीचा आवाज कार्यकर्त्यांच्या नाराजीने दबताना दिसतो आहे.
जिल्हाध्यक्ष घरात राष्ट्रवादी, दारात काँग्रेस!
राजकीय विसंगतीचा कळस म्हणजे —राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या घरातच तुतारी शांत झाली आणि बाहेर काँग्रेसचा ढोल वाजू लागला!
त्यांचे पती नवरोबा उईके यांनी थेट काँग्रेसची उमेदवारी स्वीकारत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना “पक्ष निष्ठा म्हणजे नेमकं काय?”हा प्रश्न विचारायला भाग पाडले आहे. पत्नी जिल्हाध्यक्ष, पती काँग्रेस उमेदवार —ही घटना केवळ राजकीय नसून निवडणुकीतील सर्वात मोठी विनोदपट ठरत आहे.मतदार गोंधळात, पक्ष चिंतेत एकूणच चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक म्हणजे पक्षशिस्तीचा पराभव,गटबाजीचा विजय,अपक्षांचा जल्लोष,आणि हायकमांडची अनुपस्थिती असेच चित्र सध्या दिसत आहे.
कोण निवडून येणार यापेक्षा,कोण कोणाला हरवणार हेच अधिक महत्त्वाचे बनले आहे.चंद्रपूरची ही निवडणूक निकालाच्या दिवशी केवळ नगरसेवक नाही, तर अनेक नेत्यांचे राजकीय वजनही मोजणार आहे.








