खापा :- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत, खापा नगरपरिषदेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या उपजीविका महिला बचत गटाला नगराध्यक्ष पियुष बुरडे आणि प्रभाग पाचच्या भाजप महिला नगरसेवक अंजली मेनकुदळे यांच्या हस्ते सामूहिक स्वयंरोजगार उद्योग करण्याकरिता तीन लाख साठ हजार ₹३,६०,०००/- चा धनादेश देण्यात आला. यावेळी उपजीविका महिला बचत गटाच्या शारदा बुरडे, दिव्यानी भोकरे, नलू बुरडे, वनमाला भुसारी, संगीता कापसे आणि संगीता लखदिवे यांचा समावेश होता. प्रकल्प अधिकारी प्रमोद लकडकर आणि सामुदायिक संघटक अधिकारी सुनील चौहान उपस्थित होते.








