spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सामाजिक वनीकरणामार्फत हरित सेवेचा स्तुत्य उपक्रम

किशोर साहू, मौदा,ता.१९ :- सामाजिक वनीकरण विभाग आणि वनपरिक्षेत्र रामटेक यांच्या संयुक्त माध्यमातून अरोली येथील समर्थ विद्यालयात हरित सेवा पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्यात आला.

सुरवातीला विद्यार्थ्यांना पतंग उडवतांना नॉयलन मांजाचा वापर करू नये, त्यामुळे होणारे दुष्परिणाम आदीवर मार्गदर्शन करून शपथ देण्यात आली. पर्यावरण आणि त्याचा समतोल राखणे काळजी गरज असून याबाबत विद्यार्थामध्ये आणि जनमानसात जनजागृती होणे तितकेच गरजेचे आहे. हाच उद्देश बाळगून सामाजिक वनीकरण आणि रामटेक वनपरिक्षेत्र विभागाने पर्यावरणावर चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेतली. यात विद्यार्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

सदर उपक्रम नागपूर विभागीय वनधिकारी एन. आर. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी अधिकारी रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी जे. के. ढाले, सामाजिक वनीकरणाचे आर. आर. शुक्ला, वनपाल स्वरूप केरवार, एस. जी. आझमी आदीसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकवृंद केशव डोकरीमारे, बडवाईक आदीसह शाळेतील शिक्षकांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.