spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कुलुपबंद पानठेल्याला अचानक आग

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी बस स्टँड चौक परिसरात कुलुपबंद असलेल्या पानठेल्याला आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच मोठे स्वरूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

पानठेला बंद असल्याने आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील बंटी गायकवाड,राकेश पांडे,नितु दुबे सह आदी नागरिकांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांचे प्रयत्न अपुरे ठरले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक नियाज कुरेशी यांनी तातडीने नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधून अग्निशमन वाहन घटनास्थळी पाचारण केले.यावेळी नगर परिषद अग्निशमन विभाग पथकातील मोहम्मद अनस, निखिल कापटे व पथकाने

तत्परतेने घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग लगतच्या दुकानांमध्ये व परिसरातील इतर मालमत्तेत पसरण्याचा संभाव्य धोका टळला.

Popular Articles