spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राशनचा तांदूळ दिला नसल्याची तक्रार

– शिधापत्रिका धारकांचे कारवाईकडे लक्ष 

बेला :- स्वस्त धान्य दुकान परवानाधारक शेख मेहमूद अमीर यांनी माहे ऑगस्ट महिन्याचा तांदूळ वाटप केला नसल्याची तक्रार असंख्य शिधापत्रिका धारकांनी उमरेड चे अन्नपुरवठा विभागाकडे केली. अन्नपुरवठा निरीक्षक विभावरी पाटील यांनी बयान घेऊन चौकशी अहवाल उमरेड चे तहसीलदारांना दिला.मात्र,अद्याप यामध्ये दोषी परवानाधारकांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे गावात शंका कुशंका व्यक्त होत आहे.

परमिट व टीपी नुसार सदर रास्त दुकान परवानाधारकास ऑगस्ट २०२६ करिता १९ ऑगस्टला ६४ क्विंटल गहू,४१.५० क्विंटल तांदूळ व ५८ किलो साखर उमरेड कार्यालय कडून वितरीत करण्यात आली. त्यापैकी परवानाधारकाने कोणालाही तांदळाचे वाटप केले नाही. असे चौकशीत आढळून आले. धान्य वाटप करताना ई पॉस मशीनच्या पावत्या काढल्या.मात्र त्या नेहमीच ग्राहकांना देत नाही. अशी बाब चौकशीची वेळी निदर्शनास आली. पावत्या काढून वाटप करण्यात आले.असे परवानाधारकाने शासनाला भासवले.

प्रतिक्रिया – २५ सप्टेंबरची शिधापत्रिका धारकांची तक्रार व २९ सप्टेंबरला बेला ग्रामपंचायत ने दिलेले पत्र यावरून प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन चौकशी केली तो अहवाल उमरेड तहसीलदार यांच्याकडे सादर केला. त्यांच्याकडून ५ ऑक्टोबरला नागपूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे कारवाईस पाठवला आहे. परवानाधारक शेख मेहबूब शेख अमीर यांनी महाराष्ट्र जीवनावश्यक वस्तू व वितरणाचे अधिनियम१९७५ चे१८(२) मधील अटी व शर्तीचा भंग केला आहे. कारवाई होईल.

विभावरी पाटील  पुरवठा अधिकारी उमरेड तहसील कार्यालय

प्रतिक्रिया –मिळालेला संपूर्ण तांदूळ उमरेड मध्येच परस्पर विकला असावा.परंतु बेला येथील दुकानात आला नाही. परवानाधारक दुकानात गहू व साखरच ग्राहकांना दाखवत होता. गोरगरिबांचा तांदूळ हडपने.ही अक्षम्य बाब आहे. म्हणून मी जवळपास ९० शिधापत्रिकाधारकांना सामूहिक तक्रार करायला लावली. अडकलेल्या धान्याची वसुली व पोलीस कारवाई करून परवाना निलंबित करावा.

नंदकुमार ढोबळे सामाजिक कार्यकर्ता

Popular Articles