किशोर साहू, मौदा :- घोटमुंढरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जि प शाळेच्या विद्यार्थ्यांची सकाळ सायंकाळ मोफत शिकवणी घेणारे डॉ.रंगारी यांचेकडे आलेले पाहुणे डॉ. भारती वेदक,मुलगा महेश वेदक, सून संजना महेश वेदक , सातोना गावाजवळील मांडेसर येथील डॉ.मते यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा घोटमुंढरी येथे भेट दिली असता संपूर्ण शाळा व सुविधा, विद्यार्थी अनुभव घेतले असता शाळेची कौतुकास्पद स्तुती केली आणि शहरात नसेल अशी शाळा ग्रामीण भागातील या गावात आहे याचे आश्चर्य व्यक्त केले.हे सर्व डिजिटल साधने , विद्यार्थी,शाळा बघून त्यांनी माझे काही या शाळेला देणे आहे असे समजून, ही भावना मनात आणून, शाळेला मदत म्हणून श्री.महेश वेदक यांनी स्वेच्छेने १०,००० (अक्षरी दहा हजार)रुपये देणगी दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक विकास घारगावे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे,सर्व शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्यांच्या वतीने या मोलाच्या कार्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत,सत्कार करण्यात आले.
भेट द्यायला आलेल्या पाहुण्यांनी शाळेच्या भेटी रजिस्टर वर शाळेबद्दल च्या आपल्या भावना,अनुभव थोडक्यात इंग्रजीत नोंद सुद्धा केले. ती इंग्रजीत केलेली नोंद त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष वाचन करून दाखवावे अशी विनंती करण्यात आली आणि त्यांनी ते वाचन करीत शाळा,शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती,विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करीत शुभेछा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी शाळेच्या वतीने सर्वांनी त्यांचे आभार मानले.








