spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गावातील लग्न झालेल्या मुली मतदान करायला आणण्यासाठी दहा लाखाची गाडी घेऊन जाणे व जावयाच्या खिशात 500 ची नोट टाकण्याच्या खर्च एसआयआर मुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या वाचला!

– मौदा तालुक्यातील गांगनेरसह गावागावातील पानटपऱ्यांवर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चर्चेला उधाण 

किशोर साहू:मौदा :- एसआयआर प्रक्रियेमुळे मतदान यादीतून मृत्यू पावलेले मतदार, लग्न व इतर कारणामुळे स्थलांतरित झालेले मतदार व इतरही कारणामुळे मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. महाराष्ट्रात जवळपास दोन कोटी तर संपूर्ण देशात जवळपास सात कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. एसआयआर प्रक्रियेत काही चुकून राहिलेले मृत्यू पावलेले व स्थलांतरित झालेले मतदारांची नावे सुनावणी दरम्यान वगळण्यात येणार असल्याचे बीएलओ यांनी सांगितले. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेच्या पारदर्शतेवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य व देशात काक्रोज जनता पार्टी सह विरोधी पक्षातर्फे आंदोलने सुरू आहेत.

मात्र गावातील लग्न झालेल्या मुली मतदान करायला आणण्यासाठी दहा लाखाची गाडी घेऊन जाणे व जावयाच्या खिशात 500 ची नोट टाकण्याच्या खर्च एसआयआर मुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या वाचला! अशा चर्चेला मौदा तालुक्यातील गांगनेरसह गावागावातील पान टपऱ्यांवर उधाण आलेले आहे, हे विशेष!

Popular Articles