बेला :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बेला येथील राजेंद्र उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. आठ विद्यार्थ्यांपैकी सात उत्तीर्ण झाले असून त्यातील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी लाभार्थी ठरले. त्यांना शासनाकडून वार्षिक सहा हजार रुपयेची शिष्यवृत्ती मिळेल. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांमध्ये वेदांत प्रभाकर मोते,नायरा विलास पावणकर,तन्मय भाऊराव तिमांडे,यशस्वी यशवंत धनकासार व मिहीर अजय घुसे यांचा समावेश आहे. यशामागे त्यांची अभ्यासू मेहनत, जिद्द आणि सातत्य यासोबतच शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी घेतलेले अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव यांचा मोलाचा वाटा आहे. यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मुख्याध्यापक व राजेंद्र उच्च प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.








