spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

देशात सुरगाव ठरले संविधानाने परिपूर्ण गाव भागवत लांडगे यांच्या प्रयत्नातून 

नागपूर :- नागपूर शहरात राहून भागवत लांडगे यांनी तब्बल 11 दिवस भारतीय संविधानाचे वाचन करून भारतीय संविधाना प्रति जनजागृती केली 26 नोव्हेंबर 2025 ला संविधान चौकात संविधान वाचनाचा कार्यक्रम घेऊन शहरातील नामवंत भक्तांना मार्फत भारतीय संविधानावर चर्चासत्र आयोजित केले आणि तिथूनच भारतीय संविधानाच्या वाचनाला सुरुवात केली सोबतच भारतीय संविधानाच्या 300 पुस्तकांचे मोफत वितरण हे केले डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया बेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना त्यांनी सर्वप्रथम वैशाली नगरात तब्बल दहा दिवस भारतीय संविधानाचे वाचन केले सोबत 395 कलमांचे ही वाचन पूर्ण केले हाच उद्देश समोर ठेवून भागवत लांडगे यांनी त्यांच्या जन्मगाव शिरगाव चापटी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे 27 डिसेंबर 2025 रोजी भारतीय संविधानाचे वाचन केले रमाई बुद्ध विहारात झालेल्या कार्यक्रमात एकूण 40 कुटुंब प्रमुखांना भारतीय संविधानाचे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले आणि अशा प्रकारे सुरगा हे 40 घरांचे गाव ठरले देशात आदर्श गाव आणि संविधानाने परिपूर्ण गाव

Popular Articles