spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

– पहिल्या टप्प्यात लोणबेहळ, शिरजगाव, गणेशपूर मंडळ ठरले उत्कृष्ट

यवतमाळ :- “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या 7 मार्चच्या पहिल्या टप्प्यातील शिबिरांचे गुणांकन पूर्ण झाले असून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोणबेहळ, शिरजगाव, गणेशपूर या तीन मंडळांची निवड करण्यात आली आहे.

प्राप्त गुणांनुसार आर्णी तालुक्यातील लोणबेहळ मंडळाने ५९ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेर तालुक्यातील शिरजगाव मंडळाने ५४ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला असून वणी तालुक्यातील गणेशपूर मंडळाने ५३.५ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे.

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या मंडळांचे मंडळ अधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अभिनंदन केले असून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान, इतर मंडळांनी पुढील टप्प्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

14 मार्चला दुसरा टप्पा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत पहिला टप्पा 7 मार्च रोजी पार पडला असून दुसरा टप्पा हा 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात लोहारा ता.यवतमाळ, सावर ता.बाभुळगाव, जवळा ता. आर्णी, लोही ता. दारव्हा, मोझर ता. नेर, वरुड ता. पुसद, सिंगद ता. दिग्रस, निंगपूर ता. उमरखेड, काळी दौ ता. महागाव, केळापूर ता.केळापूर, साखर खु ता. घाटंजी, खडकडोह ता. झरीजामणी, राजुरा ता. वणी, वनोजा ता. मारेगाव, वाढोणा (बा) ता. राळेगाव आणि पिंपळगाव ता. कळंब येथे शिबिरे होणार आहेत. त्यानंतर 24 मार्च, 1 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 29 एप्रिल, 8 मे, 15 मे आणि 22 मे 2026 या कालावधीत जिल्ह्यातील इतर महसूल मंडळांमध्ये टप्प्याटप्प्याने शिबिरे पार पडणार आहेत. या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Popular Articles