spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आयुष्मान कार्डचे मिशनमोडवर वितरण पूर्ण करा – जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश

– 12 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित

– महाराजस्व समाधान शिबिरांत कॅम्प सुरू करा

यवतमाळ :- जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डचे वितरण मिशनमोडवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेची आढावा बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील आयुष्मान भारत गोल्डन कार्ड व वंदना कार्ड वितरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यात आतापर्यंत 12 लाखांहून अधिक आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंतही ही योजना पोहोचवून सर्वांचे ईकेवायसी करुन कार्ड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर करावे. यासाठी नोडल अधिकारी नेमावे. तसेच या उपक्रमात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार द्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

तसेच सध्या जिल्ह्यातील मंडळस्तरावर सुरु असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरां’मध्ये आयुष्मान कार्ड अर्ज, नोंदणी, ईकेवायसी व वितरणासाठी विशेष कॅम्प सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. ग्रामीण व शहरी भागातील पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने समन्वय साधून काम करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीच्या अंतिम टप्प्यात आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेसंदर्भात रुग्णांच्या तक्रारींचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी योजना अंमलबजावणीतील प्रगती, अडचणी आणि पुढील नियोजनाबाबत माहिती सादर केली.

Popular Articles