नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तान्हा पोळ्याच्या निमित्ताने हावरापेठ येथील श्री गणपती-हनुमान मंदिर कमिटी व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित तान्हा पोळा उत्सवात सहभागी होऊन उपस्थित नागरिकांसह बालगोपाळांचा उत्साह वाढविला. तान्हा पोळ्याच्या निमित्ताने आपल्या परंपरा व संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

माजी नगरसेवक शरद बांते, माजी नगरसेविका विशाखा बांते यांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी निवडक मुलांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.





