Related Posts

टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

<p><strong>&CenterDot; राज्यात ३०० अत्याधुनिक ट्रूनॅट यंत्रे बसविणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; ग्रामीण आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> क्षयरोगाचे जलद व अचूक निदान करून &OpenCurlyQuote;टीबीमुक्त महाराष्ट्र’ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे&period; राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागांतील नागरिकांनाही जलद व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी ३०० अत्याधुनिक &OpenCurlyQuote;ट्रूनॅट क्वात्रो’ आण्विक निदान यंत्रे बसविण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यभर प्राथमिक आरोग्य केंद्रे&comma; ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हास्तरीय आरोग्य संस्थांमध्ये ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत&period; जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या या आधुनिक यंत्रांमुळे क्षयरोगाचे लवकर आणि अचूक निदान करणे शक्य होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की&comma; सुमारे ४१&period;९२ कोटी रुपये खर्चाच्या आणि २१ महिने कालावधीच्या या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाउंडेशन&comma; एचआयटीईएस–एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेड ही कार्यान्वयन संस्था आणि सहसंचालक&comma; आरोग्य सेवा &lpar;क्षयरोग व कुष्ठरोग&rpar; यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे&period; या उपक्रमामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागांतही आधुनिक निदान सुविधांचा विस्तार होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;ट्रूनॅट क्वात्रो’ यंत्रांद्वारे अवघ्या एका तासात क्षयरोगासह रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरोगाचे निदान करता येणार आहे&period; ही यंत्रे पोर्टेबल आणि बॅटरीवर चालणारी असल्यामुळे दुर्गम भागांतही त्यांचा सहज वापर करता येईल&period; यंत्रे हाताळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून&comma; निक्षय प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण कामकाजाचे डिजिटल निरीक्षण केले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकल्पामुळे राज्यात दरवर्षी सुमारे ९ लाख ३६ हजार तपासण्या करण्याची क्षमता निर्माण होईल&period; त्यातून अंदाजे १ लाख १२ हजार क्षयरुग्ण आणि ४ हजार ६८० रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरुग्ण लवकर ओळखता येतील&period; निदानातील विलंब कमी झाल्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल तसेच ग्रामीण व वंचित भागांतील नागरिकांना सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा मिळेल&period;<&sol;p>&NewLine;