Home Latest News काटोलच्या नागरिकांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

काटोलच्या नागरिकांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

0
59

नागपूर, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काटोल येथे पेय आणि खाद्य उत्पादनांच्या निर्मितीसाठी एकात्मिक सुविधा प्रकल्प उभारण्याकरिता रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून राज्य शासनासोबत १ हजार ५१३ कोटींचा करार झाला आहे, याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात काटोल तालुक्यातील नागरिकांनी आज रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी, ११ सप्टेंबर २०२५ रोजी येथे पेय आणि खाद्य उत्पादननिर्मिती प्रकल्पासाठी झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून एकात्मिक सुविधा प्रकल्पाद्वारे ५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आणि या भागातील आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याच्या भावना व्यक्त करत उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

काल राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान,अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी ₹१,०८,५९९ कोटी गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून, याद्वारे  ४७ हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे.