Home Latest News काटोलच्या नागरिकांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

काटोलच्या नागरिकांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

0

<p><strong>नागपूर&comma; दि&period; १३ &colon;<&sol;strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काटोल येथे पेय आणि खाद्य उत्पादनांच्या निर्मितीसाठी एकात्मिक सुविधा प्रकल्प उभारण्याकरिता रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून राज्य शासनासोबत १ हजार ५१३ कोटींचा करार झाला आहे&comma; याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात काटोल तालुक्यातील नागरिकांनी आज रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला&period;<&sol;p>&NewLine;<p>मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी&comma; ११ सप्टेंबर २०२५ रोजी येथे पेय आणि खाद्य उत्पादननिर्मिती प्रकल्पासाठी झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून एकात्मिक सुविधा प्रकल्पाद्वारे ५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे&period; स्थानिक भूमिपुत्रांना याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आणि या भागातील आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याच्या भावना व्यक्त करत उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;<p>काल राज्यातील विविध ठिकाणी उद्योग&comma; माहिती तंत्रज्ञान&comma;अन्नप्रक्रिया उद्योग&comma; गोदामे&comma; डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी ₹१&comma;०८&comma;५९९ कोटी गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून&comma; याद्वारे  à¥ªà¥­ हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version