Home Latest News रामटेक तालुका सुंदर गाव स्पर्धेत बेलदा व आजनी सन्मानित

रामटेक तालुका सुंदर गाव स्पर्धेत बेलदा व आजनी सन्मानित

0

<p><strong>राज्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन केले सन्मानित<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma; रामटेक १३ &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी व योग्य वापर करून गावाला आदर्श गाव बनविता येते&period; महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागा तर्फे आर&period;आर&period; पाटील सुंदर गाव योजना २०२३-२४  à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ रामटेक तालुक्यात ग्रामपंचायत आजनी व सन २०२४-२५ मध्ये ग्रामपंचायत बेलदा या दोन ग्रामपंचायतीने या योजनेत क्रमांक पटकावीला असून दोन्ही ग्रामपंचायतींना सन्मान चिन्ह&comma; प्रमाणपत्र देऊन सन्मानित कारण्यात आले&period; नागपूरच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला&period; ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; तर कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यमंत्री वित्त व नियोजन मा&period;आशिष जयस्वाल&comma; आमदार आशिष देशमुख&comma; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ&period; विनायक महामुनी&comma; माजी आमदार टेकचंद सावरकर&comma; उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव&comma; उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे&comma; आदी मान्यवर उपस्थित होते&period; यांचे हस्ते सन २०२३-२४ मध्ये क्रमांक पटकाविणाऱ्या ग्रामपंचायत आजनी येथील सरपंच मनोज लिल्हारे व सचिव वर्षा बांडेबुचे तसेच सन २०२४-२५ मध्ये क्रमांक पटकाविणाऱ्या ग्रामपंचायत बेलदा येथील सरपंच सौ&period; स्नेहा उमेश भांडारकर व सचीव निवृत्ती नेवारे यांना सन्मान चिन्ह&comma; प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले&period; यामुळे रामटेक पंचायत समितीचे नाव सध्या संपूर्ण नागपुर जिल्ह्यात नावलौकीक झालेले आहे<&sol;p>&NewLine;

Exit mobile version