Home Latest News रामटेक तालुका सुंदर गाव स्पर्धेत बेलदा व आजनी सन्मानित

रामटेक तालुका सुंदर गाव स्पर्धेत बेलदा व आजनी सन्मानित

0
65

राज्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन केले सन्मानित

सचिन चौरसिया, रामटेक १३ :- महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी व योग्य वापर करून गावाला आदर्श गाव बनविता येते. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागा तर्फे आर.आर. पाटील सुंदर गाव योजना २०२३-२४  मध्ये रामटेक तालुक्यात ग्रामपंचायत आजनी व सन २०२४-२५ मध्ये ग्रामपंचायत बेलदा या दोन ग्रामपंचायतीने या योजनेत क्रमांक पटकावीला असून दोन्ही ग्रामपंचायतींना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित कारण्यात आले. नागपूरच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यमंत्री वित्त व नियोजन मा.आशिष जयस्वाल, आमदार आशिष देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनायक महामुनी, माजी आमदार टेकचंद सावरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यांचे हस्ते सन २०२३-२४ मध्ये क्रमांक पटकाविणाऱ्या ग्रामपंचायत आजनी येथील सरपंच मनोज लिल्हारे व सचिव वर्षा बांडेबुचे तसेच सन २०२४-२५ मध्ये क्रमांक पटकाविणाऱ्या ग्रामपंचायत बेलदा येथील सरपंच सौ. स्नेहा उमेश भांडारकर व सचीव निवृत्ती नेवारे यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामुळे रामटेक पंचायत समितीचे नाव सध्या संपूर्ण नागपुर जिल्ह्यात नावलौकीक झालेले आहे