spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बोरगावात अवैधरित्या डिझेल साठवणूक व विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद

सावनेर १३ : सावनेर उपविभागीय पोलिसांच्या कारवाईत बोरगाव शिवारातील राहाटे फार्म येथे अवैधरित्या डिझेलची साठवणूक करून विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे तीनशे साठ लिटर डिझेल ज्याची किंमत बत्तीस हजार चारशे रुपये एवढी होते तसेच दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सागर सखर्ड यांना मौजा बोरगाव शिवारात बेकायदेशीर डिझेल विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गेडाम यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी रवाना झाले. तहसील कार्यालयाचे निरीक्षक मंगेश धावले आणि प्रवीण मानकर तसेच पंचांच्या उपस्थितीत फार्महाऊसची झडती घेण्यात आली असता तेथे तौकीर रजाउल्ला अन्सारी वय ३० वर्ष रा. तन्मय बार सावनेर आणि रवी शामराव ठाकरे वय ३९ वर्ष रा. बोरगाव कळमेश्वर हे संशयित इसम पोलिसांना मिळून आले. झडतीदरम्यान विविध क्षमतेच्या एकूण एकोणीस प्लास्टिक कॅनमध्ये साठवलेले डिझेल आढळून आले. आरोपींकडे या साठवणुकीचा किंवा विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळले.

प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी संगनमताने अवैधरित्या डिझेल साठवून विक्री केल्याचे स्पष्ट झाले. सदर कारवाईत पोलिसांनी एकूण तीनशे साठ लिटर डिझेल पंचासमक्ष जप्त करून त्यातील नमुना सीए तपासणीसाठी वेगळा काढला. आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 मधील कलम 287 आणि 3(5) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. स्वप्निल गेडाम, पो.हवा. माणिक शेरे, पो.शि. नितेश पुसाम, पो.शि. सतीष देवकते, पो.शि. नितेश परखड व पो.शि. भावेश शेंडे यांनी पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.