spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागरिकांनी आधार शिबिराचा लाभ घ्या – पंकज साबळे 

 – रनाळा येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन 

कामठी :- कामठी लगतच असलेल्या रनाळा येथील पंकज मंगल कार्यालयात नवीन आधार कार्ड व अपडेट दोन दिवसीय शिबिराचे आयोजन ७ आणि 9 फेब्रुवारी २०२६ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी रनाळा सरपंच पंकज साबळे यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेता कामठी तहसीलदार गणेश जगदाळे यांच्याकडे ५ फेब्रुवारी ला आधार कार्ड व अपडेट शिबिरासाठी पत्राचार केला होता. याचीच तातडीने दखल घेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी येतेवेळी आवश्यक कागदपत्रे त्यात ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र,पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स  पत्त्याचा पुरावा लाईट बिल किंवा पाण्याचे बिल (३ महिन्यांपेक्षा जुने नसावे) ,ग्रामसेवक, सरपंच यांचा विहित दाखला जन्म तारखेचा पुरावा, कोड असलेला जन्म दाखला. शुल्क तपशील डेमोग्राफिक अपडेट (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर किंवा ई-मेल) रु.७४ ,बायोमेट्रिक अपडेट (प्रौढ व्यक्तींसाठी फोटो किंवा फिंगरप्रिंट) रू .१२५ राहील. सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच पंकज साबळे यांनी केले आहे.

Popular Articles