spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एलआयसीचे कामगार नेते राजेश निंबालकर यांची ३० जानेवारी रोजी सेवा निवृत्ती; पत्नी अंजली निंबालकर यांचीही त्याच दिवशी शासकीय सेवेतून निवृत्ती — अपूर्व योगायोग

एलआयसी ऑफ इंडियाचे कर्मचारी, बीमा कामगार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव तसेच विविध कामगार संघटनांचे अग्रगण्य नेते राजेश निंबालकर हे ३० जानेवारी २०२६ रोजी एलआयसीच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला असून, देशातील एक जुझारू व तत्त्वनिष्ठ कामगार नेता म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

एलआयसीच्या वेतनवाढ करारांमध्ये निंबालकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. यासोबतच, एलआयसीतील ८,००० अस्थायी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांनी सुमारे ३० वर्षे न्यायालयीन लढा यशस्वीपणे लढवला. हा लढा कामगार चळवळीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो.

याच दिवशी एक अपूर्व आणि दुर्मिळ योगायोग घडत आहे. निंबालकर यांच्या पत्नी अंजली राजेश निंबालकर, या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात बालविकास प्रकल्प अधिकारी (प्रथम श्रेणी अधिकारी) म्हणून कार्यरत असून, त्या देखील ३० जानेवारी २०२६ रोजी आपल्या सेवाकालाची पूर्तता करून निवृत्त झाल्या.

कोरोना काळात अंजली निंबालकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाकडून “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशस्तिपत्र देऊन त्यांच्या योगदानाचे कौतुक केले होते.

पती-पत्नी दोघांचेही एकाच दिवशी सेवा निवृत्त होणे हा केवळ कौटुंबिक नव्हे, तर सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील एक प्रेरणादायी व दुर्मिळ योगायोग मानला जात आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव विविध कामगार संघटना, सहकारी व सामाजिक क्षेत्रातून करण्यात येत आहे.

या प्रसंगी कामगार नेते वर्षा नगरारे , प्रवीण भाले , विनय भोयर ,रमन हेलचेल ,नरेश सोनकुसरे, सरिता नगरारे, प्रदीप मरसकोल्हे ,आनंद कोरडे,मनोहर पौनिकर , मनोज धर्माधिकारी ,स्नेहश्री बोरकर सरिता शेंडे ,अजय शाह सहित निगम के कर्मचारी नेता तथा का कर्मचारी गण उपस्थित होते .

Popular Articles