

नागपूर :- उमरेड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार संजय मेश्राम यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून सदस्य नियुक्ती झाली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांच्या कडून,शासनाच्या कडे विधान सभा अध्यक्ष यांच्या वतीने निवड करण्यात आली आहे. आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या जबाबदारीबद्दल आ.संजय मेश्राम यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर,तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब,तसेच काँगेस पक्षातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ नेतेमंडळींचे तसेच काँगेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले आहेत.
उमरेड मतदार संघातील लोकप्रिय आमदार संजय मेश्राम हे उच्च शिक्षित असून त्यांनी आमदारकीच्या अल्पकाळात विधिमंडळात अभ्यासपूर्ण विविध संसदीय आयुधे वापरून सरकारला धारेवर धरले धरून,उमरेड मतदार संघातील व संपूर्ण राज्यातील विविध विषयाला न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे त्यांनी संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून उत्तम कामगिरी केली असल्याने त्यांच्या कार्याची दखल सरकारने घेतल्या मुळे मेश्राम यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांची नामनुियक्ती,सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे उमरेड मतदार संघात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे,खऱ्या अर्थाने उमरेड विधान सभेचे नाव रोशन करण्याचे काम आमदार संजय मेश्राम यांनी केले आहे अशा भावना जनमानसातून व्यक्त करण्यात येत आहे .
अनेकांनी लोकप्रिय आमदार संजय मेश्राम यांचे दुरध्वनी दारे आभार व्यक्त करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेछ्या दिल्या.



