spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अग्निशमन दलातील नवीन वाहनांची आयुक्तांनी केली पाहणी

– मनपा अग्निशमन विभागाच्या ताफ्यात लवकरच सहा नव्या अत्याधुनिक वाहनांचा समावेश

नागपूर :- मनपाच्या अग्निशमन विभागातील वाहन ताफ्यात लवकरच सहा नव्या अत्यानुधिक स्मॉल फायर टेंडरचा समावेश होणार असून, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी(ता.१० ) या वाहनांची पाहणी केली.

सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालय परिसरात उभ्या वाहनांची पाहणीदरम्यान मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी.,मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते, कार्यकारी अभियंता राजेश गुरनुले यांच्यासह अग्निशमन विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहराचा झपाटयाने विस्तार होत असून येथे दाटीवाटीच्या वस्त्यां मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील घनदाट लोकवस्ती व अरुंद रस्ते असल्याने अशा ठिकाणी एखादया वेळेस आगीची घटना घडल्यास घटनास्थळी मोठे वाहने जाण्यास अडथळा निर्माण होवून विमोचक कार्य करणे कठीण होते. अशा आगीच्या घटनेत जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अग्निशमन विभागाकडे छोटे फायर टेंडर असणे आवश्यक आहे. त्यानुसार सहा स्मॉल फायर टेंडर खरेदी करण्यात आले आहे. सध्या विभागाकडे चार स्मॉल फायर टेंडर उपलब्ध असून, या सहा वाहनांची क्षमता प्रत्येकी २००० लिटर इतकी आहे. हे स्मॉल फायर टेंडर मे. देवी फायर सर्व्हिस, सोलापूर यांच्याद्वारे प्राप्त झाले आहेत. सध्या या वाहनांची आरटीओ रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू असून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे स्मॉल फायर टेंडर वाहने अग्निशमन विभागाच्या वाहनांमध्ये समाविष्ट होतील.

Popular Articles