– हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
कन्हान :- छत्रपती शिवाजी महाराजांची टिपु सुलतान यांच्याशी तुलना केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला असुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कन्हान शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी याबाबत कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भात पक्षाचे नेते तथा कन्हान नगरपरिषदे चे माजी उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना निवेदन सादर केले. निवेदनात सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवुन त्यांच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सपकाळ यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपु सुलतान यांची तुलना केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडुन करण्यात आला आहे. या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला असुन, राज्यभरात संताप व्यक्त होत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमुद केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे विधान समाजात तेढ निर्माण करणारे असुन अत्यंत बेजबाबदार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा कन्हान शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना नागपुर ग्रामीण जिल्हा महा सचिव अशोक पाटील, सुनील लाडेकर, रोहित मानवटकर, कन्हान शहर अध्यक्ष रजनीश मेश्राम, संदीप कभे, हरीश खंगारे, स्वप्निल वाघधरे, राजेंद्र हटवार, मनोहर मेश्राम, मुकेश करसोलिया, माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर, संगीता खोब्रागडे, स्वाती पाठक, शशिकला बागळे, रेखा धगट, आशा छलिया यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान या प्रकरणी काँग्रेसकडुन अधिकृत भूमिका समोर आलेली नसुन पुढील घडामोडीकडे लक्ष लागले आहे.




