spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहरातील अतिक्रमणाचा सर्वे त्वरित पूर्ण करा

 – आयुक्त डॉ. विपीन यांचे सर्व विभागांना निर्देश

नागपूर :- शहराच्या हद्दीतील सरकारी जागांवर तसेच रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणाचा सर्वेक्षण मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पूर्ण करावा, असे निर्देश नागपूर जिल्हा अतिक्रमण कारवाई कृती दलाचे अध्यक्ष तथा मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील अतिक्रमणे हटविण्यासाठी आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठीत करण्यात आला आहे. याबाबत बैठक आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 14) आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, पोलीस उपायुक्त (वाहतूक) आदित्य मिरखेलकर, म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, नासुप्रचे अधीक्षक अभियंता भांडारकर, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता विजय गुरुबक्षानी, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, महावितरणच्या कार्यकारी अभियंता प्रिती फुले, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण यांच्यासह सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी या बैठकीत ऑनलाईन सहभाग घेतला.

यावेळी बोलताना आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्व विभागांनी समन्वयाने अतिक्रमण हटावची कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिस संरक्षणासाठी पोलिसांशी आधीच संपर्क साधावा. बांधकाम पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या जेसीबी किंवा इतर सामुग्री मनपातर्फे पुरविण्यात येईल. तसेच झोन स्तरावर अतिक्रमण कारवाई पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या सूचना डॉ. विपीन यांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

अतिक्रमण असलेल्या सर्व जागांचा तसेच रस्त्यावरील अतिक्रमणचा जागेवर जाऊन किंवा एआयच्या सहाय्याने सर्वे पूर्ण करावा. तसेच मनपातर्फे अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेल्या नोटीसची मुदत संपलेले बांधकाम तात्काळ तोडावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

खुल्या जागांवर कंपाउंडिंग करा

खुल्या जागेवरील अतिक्रमण काढल्यानंतर मनपाने तात्काळ संरक्षण भिंतीचे काम करण्याचे तसेच काही ठिकाणी बोलार्ड लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. खुल्या जागेवरील अतिक्रमणे काढल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी अधिकार्यांनी घ्यावी, अशी सूचना डॉ. विपीन यांनी यावेळी केली.

Popular Articles