spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कुहीत पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध

– तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन दोषींवर कठोर कारवाईची मागणी

साळवा :- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध कही येथील व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने नोंदविला. तहसीलदार अमीत घाटगे, व कुही पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत काळे, यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

शनिवारी स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग परिसरात वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर गुंडांनी दगडफेक व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. यात पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने पत्रकार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुही तालुकाध्यक्ष गुरुदेव वनदुधे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, पत्रकार समाजातील भ्रष्टाचार, अन्याय आणि प्रश्नांना उजेडात आणतात. त्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणारे असून असह्य व निंदनीय आहेत. संघटनेने शासनाला मागणी केली की, त्र्यंबकेश्वर येथील घटनेतील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात. या प्रसंगी सचीव उल्हास मेश्राम,उपाध्यक्ष रमेश लांजेवार दिलीप चव्हाण,शरद सहारे,अभिमन खराबे,परसकुमार गोंडाणे,कैलास घरडे,चंद्रमणी मेश्राम,पदाधिकारी उपस्थित होते.

Popular Articles