spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वस्तिका घोष यांच्या सुवर्णपदकाच्या यशाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

मुंबई :- २२ व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावून देशासह महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात अभिनंदन केले.

स्वस्तिका घोष यांनी कौशल्यपूर्ण आणि दमदार खेळाच्या जोरावर प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राची मान उंचावण्याबरोबरच महाराष्ट्राच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. असे सांगून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वस्तिका घोष यांच्या यशाचे कौतुक करून पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

मेहनत, जिद्द, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर स्वस्तिका यांनी मिळविलेले हे यश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही त्यांनी देशासाठी अशीच गौरवशाली कामगिरी करावी, अशी अपेक्षा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.