Home Latest News तिरोडा तालुका पत्रकार संघाच्यावतीने सुमेध नंदेश्वर अभिनंदन

तिरोडा तालुका पत्रकार संघाच्यावतीने सुमेध नंदेश्वर अभिनंदन

0
59

तिरोडा १२ :- तालुक्यातील वडेगाव येथील रहिवासी प्राथमिक शिक्षक किशोर नंदेश्वर यांचा मुलगा डॉ. सुमेध नंदेश्वर याने ऑल इंडिया नीट पीजी मध्ये 1511 ऑल इंडिया रँक प्राप्त करून तिरोडा तालुक्याचे नाव लौकिक वाढवला व आपल्या यशाचा मार्ग मोकळा केला. त्याबद्दल तालुका पत्रकार संघ तिरोडा यांच्यावतीने त्याच्या आई-वडिलांचे अभिनंदन करून  सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक विजय खोब्रागडे सदस्य हितेश वालदे, लॉकेट वालदे, सेवानिवृत्त शिक्षक ए. झेड नंदेश्वर , किशोर नंदेश्वर,  दिलीप बिसेन, कान्हा नंदेश्वर मालती नंदेश्वर आपल्या  यशाचे श्रेय   आई-वडील आणि गुरुजनांना दिले आहे.  मेडिसिन ह्या विषयामध्ये एमडी करण्याचे मनोगत त्यांनी जाहीर केले