Home Latest News महाराष्ट्र सदनात नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे निवासी आयुक्त आर....

महाराष्ट्र सदनात नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून अभिनंदन

0
117

 

नवी दिल्ली, ११ – देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती  सी. पी. राधाकृष्णन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी  आर. सुमती यांचे महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आगमन झाले असता, निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांचे औपचारिक आणि हृद्य अभिनंदन केले.

स्वागतादरम्यान  आर. विमला यांनी उपराष्ट्रपती दांपत्याला पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उपस्थित होते.

केंद्रीय गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन, यासह राष्ट्रपती कार्यालयाचे अतिरिक्त सचिव डॉक्टर राकेश गुप्ता यांनीही आज महाराष्ट्र सदनात उपराष्ट्रपती  सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.  निवासी आयुक्त  आर. विमला यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.