spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धिरेंद्र शास्त्रीच्या ‘त्या ‘वक्तव्याचा कांग्रेस तर्फे निषेध – डॉ सुनील वाघमारे

कामठी :- कथावचक धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा या कथावाचकाने महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत संतापजनक असे वक्तव्य नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले त्या वक्तव्याचा कामठी शहर कांग्रेस सेवादल तर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून धिरेंद्र शास्त्री यांच्यावर कठोरात कठोर कारवाईची मागणी कामठी शहर कांग्रेस सेवादल अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. सर्वसामान्यांना हाताशी धरत रयतेचे राज्य निर्माण केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात जाती पातीला स्थान नव्हते तर अगदी तळागळातील व्यक्तींचा देखील आदर राखला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदराचे स्थान अटळ आहे.अशा रयतेच्या राजाबद्दल धिरेंद्र शास्त्री या कथावाचकाने नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत तांच्या समक्ष ‘छत्रपती शिवाजी राजे यांनी आपण आता थकले आहोत त्यामुळे मी हे माझें स्वराज्य आणि मुकुट आपल्या चरणी ठेवत आहे त्याचे रक्षण आपण करावे, असे रामदास स्वामी यांना म्हटले होते.असे वादग्रस्त विधान केले.या विधानामुळे संपूर्ण शिवप्रेमीत संतापाची लाट पसरली असून धिरेंद्र शास्त्री यांचा कामठी शहर कांग्रेस सेवादल तर्फे निषेध करण्यात येत आहे.रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने छत्रपतींना कमी लेखण्याचा प्रयत्न केलेल्या धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वरबाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी डॉ सुनील वाघमारे यांनी केले आहे.

Popular Articles