spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत तापमानाचा पारा 44 अंशावर;जनजीवन विस्कळीत

कामठी :- कामठी तालुक्यात तापमानाच्या पाऱ्याने उच्चाक गाठला आहे.तब्बल 44 अंशावर तापमान केल्याने त्याचा परिणाम जनजिवणावर झाल्याचे दिसून आले.दुपारी 12 ते 4 या वेळेत कामठी करांनी घरातच राहणे पसंत केले आहे.पुढील आठवड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा यंत्रणेने दिला आहे नागरिकांनी उन्हाळ्यात आपली काळजी घ्यावी असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

कामठी तालुक्याचा तापमानाचा पारा 44 अंशावर गेल्याने कामठीकरांना उन्हाचा चांगलाच सामना करावा लागत आहे.दुपारच्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.वाढत्या उन्हाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून उलट्या,मळमळ होणे, चक्कर येणे,अतिसार होणे सह विविध आजारांच्या रुग्णामध्ये वाढ झाली असून खाजगी सह सरकारी रुग्णालयात उपचार घेतले जात आहेत.उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे जनजीवणावर विपरीत परीनाम होत असून जीवाची काहिली होत आहे.जीवाला गारवा मिळावा म्हणून उसाचा रस,बर्फाचा गोळा,लिंबू सरबत सह कोल्ड्रिंक्स चे सेवन केले जात आहे.मात्र नागरिकांनी पाणी ताक अन ओआरएस यासारख्या पदार्थाचे सेवन करणे गरजेचे आहे.उन्हाळ्यात हलके सुती कपडे,डोक्यावर टोपी आणि छत्री वापरणे देखील गरजेचे असून या काळात लहान मुले वृद्ध याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Popular Articles