कामठी :- येत्या 18 जून ला होऊ घातलेल्या नागपूर विधानपरिषद निवडणुकीचे कांग्रेस चे उमेदवार महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ता व महासचिव अतुल लोंढे यांनी काल मौदा व कामठी येथे काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली.याप्रसंगी उपस्थित नगरसेवकांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रतिनिधींचा कांग्रेसच्या विचाराभिमुख विचारसरणीला पाठींबा असून कांग्रेस चे अधिकृत उमेदवार अतुल लोंढे यांचा विजय होणारच असा विश्वास व्यक्त करीत सर्वानी एकजुटीने काम करून कांग्रेस चा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला. कामठी नगर कांग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष सुरेश भोयर, कामठी नगर परिषदचे माजी अध्यक्ष शकूर नगानी ,जिल्हा परिषद चे माजी बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस,कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता काशिनाथ प्रधान,कामठी नगर कांग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज यादव आणि महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक स्थानिक संस्थांचे विविध प्रतिनिधी, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते गण सहभागी झाले होते.
यासोबतच काँग्रेस पक्षाचे इतर वरिष्ठ नेते सर्व गटनेते व पक्षाचे नगरसेवक बैठकीस उपस्थित होते







