spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पुढाकाराने चेंबरच्या झाकणांची दुरुस्ती, नगर परिषद मध्ये निधीची कमतरता, स्वखर्चाने केले दुरुस्त

खापा :- नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. यात भाजप पिछाडीवर असूनही नगरपरिषद येथे सत्ता स्थापन केली. दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक हे पोरके पडल्यासारखे झाले. त्यातच नगरपालिकेमध्ये निधीची कमतरता तसेच राखीव निधीही नसल्याने छोटे मोटे काम करण्यासाठी नगराध्यक्षांना, नवीन नगरसेवकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच मार्ग काढत नगरसेवक हे स्वखर्चाने जनतेचे काम करण्याच्या तयारीला लागले आहे.

अशातूनच प्रभाग चार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील सांडपाण्याचे चेंबर आणि त्याची झाकण गेल्या कित्येक दिवसापासून तुटलेली होती. चेंबरभोवती खड्डे पडलेले होते. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना सतत धोका निर्माण होत होता. जनतेला होणारा हा त्रास बघून काँग्रेसच्या प्रभाग चारच्या नवनियुक्त नगरसेविका कविता स्वप्निल धराडे यांनी दि. ५ रोजी गुरुवारला स्वखर्चाने दुरुस्ती करून रहदारीला सुरळीत केले. त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्यातीने त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे.

मनोगत:-

माझ्या प्रभागातील माय माऊली जनतेने माझ्यावर विश्वास दिलेला आहे आणि हा विश्वास मी कशाही प्रकारे तळाला जाऊ देणार नाही. जनतेची सेवा मी निस्वार्थपणे करीत राहील.

– कविता स्वप्निल धराडे, प्रभाग चार नगरसेविका, न. प. खापा.

Popular Articles