गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात कांग्रेस चे सरकार विरोधात आंदोलन

0
41

कामठी :- केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने घरगुती गॅस व व्यवसायिक एल पीजी गॅस सिलेंडर च्या दरात 60 रुपयांची वाढ केल्याच्या निर्णया विरोधात व निर्माण झालेल्या सिलेंडर च्या तुटवडयाच्या पाश्वरभूमीवर वाढत्या महागाईचा भार सर्वसामान्य नागरिकावर टाकणाऱ्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कांग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार कामठी तालुका कांग्रेस कमिटी तर्फे कामठी तहसील कार्यालय समोर 12 मार्च ला सकाळी 11 वाजता सरकार विरोधात ‘गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा’,लाडक्या बहिणींना लुटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, नरेंद्र झाले सरेंडर , महागाईचा झटका लाडक्या बहिणींना फटका ,देशद्रोही मोदी सरकारचा निषेध असो असे नारे निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले.आंदोलनानंतर कामठी तालुका कांग्रेस कमिटी च्या वतीने तहसीलदार गणेश जगदाडे यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागाणी करण्यात आली.

याप्रसंगी आंदोलनाचे नेतृत्वकार कामठी मौदा विधानसभेचे नेते सुरेश भोयर यांनी भाजप सरकारवर ‘अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.युपीए सरकारच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर चा दर सुमारे 400 रुपयांच्या आसपास होता तर सध्याच्या भाजप सरकारच्या काळात तो जवळपास हजार रुपया पर्यंत पोहोचल्याचा दावा कांग्रेस ने केला त्यामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवणातील मूलभूत गरजावर अधिक खर्च करावा लागत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडत असून महागाईचा फटका थेट घराघरात बसत आहे .गॅस सिलेंडर च्या वाढत्या किमतीमुळे स्वयंपाक घराचा खर्च लक्षणीय वाढत असल्याची टीका केली.पूर्वी 15 दिवसाचा असलेला गॅस सिलेंडर नोंदणी चा कालावधी आता 25 दिवसापर्यंत वाढविण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच व्यवसायिक गॅस सिलेंडर चा तुटवडा निर्माण झाल्याने लघुउद्योग आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम होत असल्याचे कांग्रेस नेता सुरेश भोयर यांनी सांगितले.

या आंदोलनात कांग्रेस नेता सुरेश भोयर,माजी जी प सदस्य दिनेश ढोले,कामठी तालुकाध्यक्ष अनंता वाघ, कामठी शहर कांग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज यादव, कामठी शहर कांग्रेस सेवादल अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समिती कामठी चे उपसभापती कुणाल इटकेलवार,राजेश बनसिंगे,रत्नदीप रंगारी, कमलाकर मोहोड,माजी सभापती सचिन मांनवटकर, प्रवीण कुथथे,प्रभाकर हूड,सुधीर शहाणे,रमेश कडू, नगरसेवक अहफाज अहमद,अनिल सूर्यवंशी,प्रतिमा गजभिये,सातीका खांडेकर,शाजिया बेगम, महिला अध्यक्ष इशरत खान, राजकुमार गेडाम,अलंकार गजभिये, निरज लोणारे, किशोर धांडे,छत्रपाल करडभाजने,शिवम धुर्वे,ऑन हैदरी,मनोज रंगारी, दिनू नागदेवें, ममता कांबळे, ज्योती कारेमोरे,सरिता रंगारी,गुल अफशा नसरूद्दीन,मो इम्रान नईम मसूद अहम अन्सारी,रत्ना उईके,हर्षवर्धन गजभिये व अनेक कांग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.