मंगल कार्यालये, लॉन आणि केटरिंग सेवांच्या ठिकाणी व्यावसायिक गॅस वापराबाबत अनिवार्य फलक लावण्याचे आवाहन

0
57

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन आणि केटरिंग परवानाधारकांना सुचित करण्यात येते की, मंगल कार्यालये, लॉन आणि केटरिंग सेवा कार्यरत असून शासन नियमानुसार अशा व्यावसायिक ठिकाणी केवळ व्यावसायिक (commercial) गॅस सिलेंडर वापरणे बंधरकारक आहे. तथापि अनेक ठिकाणी अजुनही घरगुती (Domestic) गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचे दिसून येत असून सदरहुबाब अन्न नागरी पुरवठा विभागाच्या नियमांचे उल्लंघन असून असुरक्षित देखील आहे.

त्याअनुषंगाने गडचिरोली तालुक्यातील प्रत्येक लॉन, हॉल आणि केटरिंगच्या स्वयंपाक घराच्या ठिकाणी दर्शनी भागात पुढीलप्रमाणे मजकुराचा बोर्ड लावणे अनिवार्य आहे.

“येथे केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर केल्या जाईल.

घरगुती गॅसचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.”                                                                            आदेशानुसार