spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपातर्फे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकातर्फे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, तथा देशाचे माजी संरक्षणमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त बुधवारी (ता.१२) विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील महापौर दालनापुढे आयोजित छोटेखानी समारंभात महापौर निता ठाकरे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., नगरसेवक श्रीकांत आगलावे, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी,  अमोल तपासे, शैलेश जांभूळकर यांनी सुद्धा पुष्पांजली वाहून अभिवादन केले. तत्पूर्वी अजनी चौकातील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपमहापौर लिला हाथीबेड यांनी पुष्पहार अर्पण केला मनपातर्फे अभिवादन केले. याप्रसंगी माजी नगरसेवक तानाजी वनवे,दिलीप पनकुले, अनिल अहिरकर, राजाभाऊ टाकसाळे यांच्यासह इतर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.