spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा शहरातील नागरी समस्यांवर नगर परिषदेला काँग्रेसचे निवेदन

भंडारा :- शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भंडारा शहर काँग्रेस तर्फे नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांचे दैनंदिन जीवनमान सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात शहरातील मुख्य रस्ते व उपरस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती व डांबरीकरण, नाल्यांची नियमित साफसफाई, पिण्याच्या पाण्याचा नियमित व पुरेसा पुरवठा, कचरा संकलन व व्यवस्थापन सुधारणा, सार्वजनिक शौचालये व बसस्थानकांमध्ये स्वच्छतेची सोय तसेच अनधिकृत पार्किंग व हातगाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी  खा. डॉ प्रशांत पडोळे यांनी काँग्रेस पक्षातर्फे स्पष्ट इशारा दिला आहे की, जर वरील समस्यांचे त्वरित निराकरण झाले नाही, तर याविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल.

यावेळी खा. डॉ प्रशांत पडोळे, प्रदेश महासचिव जिया पटेल, शहर अध्यक्ष धनराज साठवणे, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, माजी नगर सेवक शमिम शेख, माजी नगर सेवक पृथ्वी तांडेकर, जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे, इमरान पटेल, गजानन बादशाह, आवेश पटेल, नरेंद्र साकुरे, जीवन भजनकर, नवाब शेख, किशोर राऊत, कमल साठवणे, आकाश ठवकर, श्रीकांत बांसोड, स्नेहा भावते ,जितेश चांदेवार ,राजू लांजेवार ,जीवन कावडे, कावडे गुरुजी व अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.